Share

‘रावण खलनायक नव्हता’असं म्हणणारा सैफ अली खान होतोय ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सैफ अली खान लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘आदिपुरुष’ असं आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये सैफ अली खान ‘लंकेश’ म्हणजे रावणाची भूमिका साकारणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटले की ‘रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘राक्षसी राजाची व्यक्तिरेखा साकारणे मनोरंजक आहे, परंतु तो इतके क्रूर नव्हता. रावण हा माणूस म्हणून कसा होता? याचे चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, या युद्धालाही एक पार्श्वभूमी आहे. श्री रामाच्या धाकटा भाऊ लक्ष्मण यांनी रावणाची बहीण सुर्पनखाचे नाक कापले होते. त्यांनतर हे युद्ध होणारच होते. रावणची विचारसरणी काय होती? हे या चित्रपटातून प्रेक्षकांच्यासमोर घेऊन येणार आहोत, असे सैफ मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे.

मुलाखतीतील सैफच्या वक्तव्यामुळे लोक भडकले आहे. रावणाने सीतेचं केलेल्या अपहरणाचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित करीत आहे. यानंतर #BoycottAdipurush आणि #WakeUpOmRaut ट्विट करीत चित्रपटावर बहिष्कार घालत आहेत. अनेकांनी सैफ अली खानला चित्रपटातून बाहेर करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!