Share

संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : यंदा सण-उत्सव साजरे करण्यावर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्बंध आले आहेत. गणेशोत्सव, ईद, दसरा, यासोबतच सर्व धर्मिय सणांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व सण साधेपणाने व खबरदारीने साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांनी देखील साधेपणाने हे सण साजरे केले.

नुकत्याच झालेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी देखील वारकरी मंडळींनी पंढरपूरला जाणे टाळले. आता कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून पुढचे 10 दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं घेतला आहे.

कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपूरातून येणाऱ्या मानाच्या ३ दिंड्यांसमवेत प्रत्येकी केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय संजीवन समाधी सोहोळ्याला वारकऱ्यांनी गर्दी करु नये, म्हणूनही काही ठराविक मान्यवरांना पास देण्यात येत आहेत. आगामी 14 तारखेपर्यंत माउलींच्या संजीवन समाधीचा सोहोळा चालणार असल्यानं 16 तारखेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!