🕒 1 min read
मुंबई : आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर १ जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.
हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआई) घेतला आहे. NPCI ने याचबरोबर थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
पण पेटीएमच्या ग्राहकांवर या नियमाचा परिणाम होणार नाही. युपीआय पैसे ट्रान्सफर करताना लावला जाणारा हा चार्ज पेटीएमला लागणार नाही. पण, हे (Phonepe), (Google Pay), (Amazon Pay) या पेमेंट अॅपवरून पैसे ट्रान्सफर केल्यास आकारले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदाराचा थेट विरोधी पक्षनेत्यासोबत प्रवास; राजकीय चर्चांना उधाण
- संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
- महापरिनिर्वाण दिन : मुख्यमंत्री, राज्यपालांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
- शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते संजय राऊतांच्या भेटीला; प्रकृतीची केली विचारपूस
- महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम राहणार : जयंत पाटील


