🕒 1 min read
मुंबई: ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशादरम्यान एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून खडसेंबाबतची तक्रार केली होती. मात्र शरद पवारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करत एकनाथ खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अंजली दमानिया माध्यमांशी बोलतांना केला.
भाजप सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी दमानियांवर केलेल्या टीकेनंतर ‘कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही’, असा थेट इशारा दिल्यानंतरही खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशदरम्यान त्यांच्यावर पुन्हा वादग्रस्त टीका केली होती.
खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजप सोडताना खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले होते. याच पार्श्वभूमीवर, खडसे आणि दमानिया यांच्यातील वाद अद्यापही सुरूच असलेला पाहायला मिळतो आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकासआघाडी सरकारने शरद पोंक्षे यांना विधान परिषदेत पाठवू नये- सचिन खरात
- मोबाइलला नेटवर्क नाही म्हणून त्यांनी गावच काढले विकायला !
- संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’
- शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद : पाटील
- जाणून घ्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येत खरच घट होत आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
