🕒 1 min read
पुणे : पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८८ हजार ६८२ इतकी झाली आहे. शहरातील २९४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७७ हजार ५७९ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार २१७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख ३६ हजार ३२३ इतकी झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार २९५ रुग्णांपैकी २०३ रुग्ण गंभीर तर ३५८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८०८ इतकी झाली आहे.
दरम्यान, राज्यातील 25 जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. या बैठकीवेळी पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यास मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच पुण्यातील निर्बंध शिथील होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते माहिम बेस्ट बस डेपोचे उद्घाटन
- राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट
- बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्यालाच; खंडपीठाचा हस्तक्षेपास नकार
- ‘आठ दिवसांत कोरोना काळातील बिले द्या, अन्यथा..’ आ. धस यांचा इशारा
- मी माझी स्थिती एकनाथ खडसेंसारखी होऊ देणार नाही-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
