Share

‘ते’ संभाषण खरे की खोटे शरद पवारांनी सांगावे; भातखळकरांचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (८ मार्च) विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब टाकून खळबळ माजून दिली. यावर आता अनेक राजकिय प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar challenge) यांनी पवारांना थेट आव्हान दिले आहे.

“१२५ तासांचं रेकॉर्डिंग कोणा शिवाय शक्य आहे किंवा नाही हे सांगण्यापेक्षा त्या रेकॉर्डिंगमध्ये झालेले संभाषण खरे आहे की खोटे एवढेच पवार साहेबांनी सांगावे.”, असे आव्हान अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत दिले आहे.

नेमके काय म्हणाले शरद पवार?

“१२५ तास रोकॉर्डिंग करणं सहज शक्य आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे रेकॉर्डिंगसाठी यंत्रणांचा गैरवापर केल्याचे नाकारता येत नाही. रेकॉर्डिंगच्या सत्यतेची पडताळणी गरजेची आहे. सरकारनं चौकशी करावी.”, असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच मविआ सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असून सत्तेचा गैरवापर करून चौकशी कशी केली जाते याचं देशमुख उदाहरण आहे. केंद्रातील गैरवापर करून अनिल देशमुखांची चौकशी करण्यात आली. असेही पवार यांनी म्हटले आहे.

“माझं अप्रत्यक्ष नाव घेतलं मात्र माझा संबंध नाही असे शरद पवार म्हणत आहेत. मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, सत्तेचा गैरवापर करून चौकशी कशी केली जाते याचं उदाहरण देशमुख. केंद्रातील गैरवापर करून अनिल देशमुखांची चौकशी. असेही शरद पवार म्हणाले सरकारी अधिकाऱ्याची 125 तासांची रेकॉर्डिंग झाली. रेकॉर्डिंगसाठी शक्तीशाली यंत्रणेच्या वापराची शक्यता. अनिल देशमुखांच्या विरोधात 90 छापे टाकण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!