🕒 1 min read
मुंबई : क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर चित्तथरारक लढतीचा आनंद घेता आला. केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने अवघ्या २ धावांनी कोलकाता नाइट रायडर्सला (KKR vs LSG) मात दिली आणि १८ गुणांसह प्लेऑफचे तिकीट मिळवले. कोलकातासाठी करो या मरो असलेल्या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला २११ धावांचे आव्हान दिले. सलीमीवीर डी कॉकने १० चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी करत १४० धावांची शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात अवघड वाटणाऱ्या या आव्हानाला कोलकाताने शेवटपर्यंत तोंड दिले. शेवटच्या षटकात २१ धावांची गरज असताना रिंकू सिंह मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि कोलकाताने हा सामना गमावला. या पराभवामुळे कोलकाताचे हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.
कोलकाताचा डाव
लखनऊचा नवा तारा मोहसीन खानने कोलकाताला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने सलामीवीर व्ंयकटेश अय्यर (०) आणि अभिजीत तोमरला (४) स्वस्तात गुंडाळले. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने कप्तान श्रेयस अय्यरसह अर्धशतकी भागीदारी केली. राणानेन २२ चेंडूत ९ चौकारांसह ४२ धावा केल्या. कृष्णप्पा गौतमने राणाला बाद करत ही भागीदारी मोडली. मग श्रेयसने सॅम बिलिंग्जला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली. १४व्या षटकात श्रेयस अर्धशतक ठोकून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावांची सुंदर खेळी केली. रवी बिश्नोईने १६व्या षटकात बिलिंग्जला बाद करत कोलकाताला संकटात टाकले. बिलिंग्जने २ चौकार आणि ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. पुढच्याच षटकात कोलकाताचा आधारस्तंभ आंद्रे रसेलला (५) मोहसीन खानने दीपक हुडाकरवी झेलबाद केले आणि लखनऊने सुटकेचा निश्वास टाकला, पण रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांनी मोठे फटकेस खेळत रंगत निर्माण केली. शेवटच्या षटकात कोलकाताला २१ धावांची गरज होती. स्टॉइनिसने टाकलेल्या या षटकात रिंकूने १८ धावा चोपल्या, पण तो पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. एविन लुईसने त्याचा एकहाती झेल टिपला. रिंकूने १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावांची झुंजार खेळी केली. पुढच्या चेंडूवर स्टॉइनिसने उमेश यादवची दांडी गूल केली आणि लखनऊचे प्लेऑफचे तिकीट पक्के केले. नरिन ७ चेंडूत ३ षटकारांसह नाबाद २१ धावा केल्या. २० षटकात कोलकाताने ८ बाद २०८ धावा केल्या. लखनऊकडून मोहसीन खान आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी ३ बळी घेतले.
Spare a thought for Rinku Singh – when Andre Russell fell Kolkata Knight Riders needed 61 off 20 balls and were all but done.
He dragged them to needing three off two balls, before falling just short.#IPL2022 pic.twitter.com/evIgUZatTS
— Wisden (@WisdenCricket) May 18, 2022
Not the result we wanted but super proud of this effort!
???????????????????????? ???????????? ????????????, ???????????????????????? ???????????? ????????????… forever! ????#AmiKKR #KKRvLSG #IPL2022 pic.twitter.com/2eYhWxM8Ys
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 18, 2022
No point being sad after a contest like that ❤️#IPL2022 #KKRvsLSG pic.twitter.com/6FBDrsPFXM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 18, 2022
लखनऊचा डाव
कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनऊसाठी दमदार सलामी दिली. या दोघांनी १३व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. १२व्या षटकात डी कॉकने तर १४व्या षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या १६व्या षटकात लखनऊने १८ धावा चोपल्या. १८व्या षटकात डी कॉकने आंद्रे रसेलला चौकार ठोकत आयपीएलमधील दुसरे शतक साजरे केले. टिम साऊदीने टाकलेल्या पुढच्या षटकात लखनऊने चार षटकारांसह २७ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात लखनऊने १९ धावा चोपल्या. २० षटकात लखनऊने बिनबाद २१० धावा केल्या. डी कॉकने १० चौकार आणि १० षटकारांसह नाबाद १४० तर राहुलने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौत, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई.
कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), रिंकू सिंह आंद्रे रसेल, सुनील नरिन, उमेश यादव, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

