🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये स्पर्धेतील ६६वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (KKR vs LSG) यांच्यात खेळवला जात आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि कप्तान केएल राहुलच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला २११ धावांचे आव्हान दिले आहे. राहुलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलीमीवीर डी कॉकने १० चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी करत १४० धावांची शतकी खेळी केली.
लखनऊचा डाव
कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनऊसाठी दमदार सलामी दिली. या दोघांनी १३व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. १२व्या षटकात डी कॉकने तर १४व्या षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या १६व्या षटकात लखनऊने १८ धावा चोपल्या. १८व्या षटकात डी कॉकने आंद्रे रसेलला चौकार ठोकत आयपीएलमधील दुसरे शतक साजरे केले. टिम साऊदीने टाकलेल्या पुढच्या षटकात लखनऊने चार षटकारांसह २७ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात लखनऊने १९ धावा चोपल्या. २० षटकात लखनऊने बिनबाद २१० धावा केल्या. डी कॉकने १० चौकार आणि १० षटकारांसह नाबाद १४० तर राहुलने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.
WOW! ????
KL Rahul and Quinton de Kock are the first opening pair in IPL history to bat through an innings without losing a wicket!
De Kock hit 140 runs as Lucknow Super Giants set Kolkata Knight Riders 211 to win.
???? Listen on @5liveSport extra and @BBCSounds #BBCCricket
— Test Match Special (@bbctms) May 18, 2022
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौत, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई.
कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), रिंकू सिंह आंद्रे रसेल, सुनील नरिन, उमेश यादव, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

