Share

“पदावर बसलेले लोक तारतम्य बाळगत नाहीत”- शरद पवार

Published On: 

उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना पवार म्हणाले कि, कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी म्हणतो सोडून द्या.

हे राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा हे ठरवायला हवे. ज्या छत्रपतींचा उल्लेख आपण केला त्या शिवछत्रपतींचं आयुष्य जिजाऊंनी घडवलं. कर्तृत्वाचा वसा पुरुषांनी नाही तर स्त्रियांनी जपला आहे.  सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात रमाबाईंचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे. ज्यांनी भारताला घटना दिली, त्यांच्यापाठी रमाबाई उभ्या राहिल्यामुळे त्यांना ते करता आले, असे शरद पवार म्हणाले.

“मी पुन्हा येईन.. आम्ही येऊ दिलं तर ना”- शरद पवार

उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेल्या पक्षांतराविषयी पवार म्हणाले कि, जे राष्ट्रवादीला सोडून गेले ते सोडून गेले, आता त्यांची चिंता करण्याची गरज नाही. उस्मानाबादच्या पाणी प्रश्नावरही त्यांनी आपली मते मांडली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर पवारांना आपल्या खुमासदार शैलीत टीका केली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!