मुंबई : आयपीएलमध्ये २०२२ मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीने शेवटच्या षटकात मुंबईकडून सामना हिरावला. या पराभवानंतर रोहित शर्माकडून प्रतिक्रिया आली. रोहित शर्मा म्हणाला, की आम्ही आमच्या योजनेनुसार गोलंदाजी करू शकलो नाही.
रोहित म्हणाला, ”आम्हाला वाटले की ही चांगली धावसंख्या आहे. सुरुवातीला १७० धावा करता येतील अशा खेळपट्टीसारखी दिसत नव्हती, पण आम्ही चांगले खेळलो. आम्ही आमच्या योजनेनुसार गोलंदाजी केली नाही. पहिला सामना असो किंवा शेवटचा सामना असो, आम्ही नेहमी तयार असतो. आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. गोष्टी योजनेनुसार घडत नव्हत्या. तुम्हाला फक्त एक गट म्हणून जवळ राहून शिकण्याची गरज आहे. पराभवाने मी निराश झालो आहे, पण सर्व काही संपलेले नाही.”
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारली. मुंबईने ५ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करताना नाबाद ८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीने ६ बाद १७९ धावा केल्या आणि सामना जिंकला. दिल्लीसाठी हा सामना खडतर होता पण ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी विजय सोपा केला.
महत्त्वाच्या बातम्या –
- अजून एक जेतेपद..! पी. व्ही. सिंधूनं जिंकली स्विस ओपन स्पर्धा
- “काही दिवटे मातोश्रीना पैसे आणि भेटीची घड्याळं…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचे टीकास्त्र
- बापरे..! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड; वाचा नक्की झालं काय!
- ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठा राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली
- IPL 2022 : राशिद खानला मिळाली मोठी जबाबदारी..! पहिल्या सामन्यापूर्वी बनला गुजरात संघाचा…

