उस्मानाबाद : सध्या आमदारांना मुंबईत घरे देण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही. जो निर्णय झाला नाही, त्याची अंमलबजावणीही होणार नाही, आमदारांनी घरांची मागणी कधी केलीच नाही, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं.
तुळजापूरमध्ये आज सोमवारी सकाळीच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील होत्या. चव्हाण यांनी देवीचे दर्शन घेतले. देवीची आरतीही यावेळी करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “आमदारांना घरे देण्याचा असा कुठलाही निर्णय झाल्याचं मला माहिती नाही. कुणाची मागणीच नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधकांनी यावरून उगाच आरोप केले आहेत. मात्र आमदारांना घरे देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही”.
महत्वाच्या बातम्या –

