मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून चर्चेत आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वारंवार टीका आणि आरोप केले आहेत. तसेच नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद काहीसा शांत झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतील वाशी येथे एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा या बारचा परवाना मिळाला तेव्हा समीर वानखेडे यांचे वय १७ वर्षे होते, एवढ्या कमी वयात त्यांना परवाना मिळलाच कसा, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला होता.
समीर वानखेडे यांना त्यांच्या नावावर असलेल्या या बार प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात आजच आदेश काढण्यात आले आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर कसा, याचे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“सुपरमार्केट मध्ये वाईन विकण्याचा निर्णय…”; शरद पवारांचे मोठे विधान
सर्वांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास; शेतीला सोयीसुविधा देणारा अर्थसंकल्प-रमेश कराड
मुंबईत कॉंग्रेस – भाजप आमने सामने; प्रसाद लाड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
दादाच्या शो मध्ये येणार “काचा बदाम” फेम भुबम ; व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेत
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसीचे रूग्णालय उभारणार-कामगार मंत्री हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

