मुंबई : अलिकडे सोशल मीडिया एक खुल व्यासपीठ बनलं आहे. आपल्या कलागुणांना लगेच प्रतिसाद देखील मिळत असतो. आता हेच बघा ना, ‘कच्चा बादाम’ हे गाणं सर्वत्र धुमाकुळ घातल आहे. या गाण्यावर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी रिल्स, व्हिडीओ तयार करून शेअर करत आहेत. मात्र आपल्याला माहित आहे का या गाण्याचा मूळ गायक कोण आहे. चला जाणून घेऊ या.
दरम्यान ‘ कच्चा बदाम ‘ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर #KacchaBadam हा हॅशटॅग ट्रेंड प्रचंड चर्चेत आला आहे. हे गाणं कोणत्याही चित्रपटातील नाही किंवा ते कोणत्याही मोठ्या गायकाने गायलेले नाही, तर चक्क एका शेंगदाणा विक्रेत्याने सहज म्हटलेलं हे गाणं आहे. तसं गाण्याचे बोल बंगाली भाषेत आहेत, जे ‘बदाम बदाम दादा कांचा बदाम..’असं असून या गाण्यावरील व्हिडीओ प्रचंड पसंती मिळत आहे.
हे गाणं भुबन बादायकर (Singer Bhuban Badyakar) याने गायलं आहे. कोण आहे हा भुबन बादायकर तर तो मूळचा बंगाली असून भुबन दररोज त्यांच्या हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकतात. या कच्च्या भुईमुगाच्या शेंगांना बंगाली (Bengali) भाषेत काच्चा बादाम म्हटलं जातं. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने हा वेगळा अंदाजा अवलंबला आहे. त्याने गायलेलं हे गाण खूप लोकप्रिय तसेच रातोरात प्रचंड व्हायरल ही झालं आहे.
असं आहे गाणं
बदाम बदाम दादा कांचा बदाम
आमर कच्छे नैतो बूबू वाजा बदाम
आमर कच्छे पाबे सुधू वाजा बदाम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाणे भुबन बडईकरने गायले आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील कुरलजुरी गावचा आहे. त्याच्या वडिलांना तीन भाऊ आहेत. आणि पोट भरण्यासाठी ते शेंगदाणे विकण्याचे काम करतात. सायकलवर शेंगदाण्यांनी भरलेली पिशवी लटकवून तो घरातून निघतो आणि ‘कच्चा बदाम’ गाणं म्हणत गावोगावी जातो. तेथे ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकतात. रोज ३-४ किलो विकून भुवनाला दोनशे ते अडीचशे रुपयेच मिळतात.
तसेच भुबन म्हणाला, ‘माझ्या गाण्याबद्दल लोकांना माहिती व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. सरकारने मला मदत करावी आणि काही निधी द्यावा, जेणेकरून मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकेन. आजवर या गाण्यावर लाखों रील्स, व्हिडीओ बनवल्या गेल्या आहेत. त्यातून शब्द जरी कळत नसतील, मात्र या तालावर कलाकारांची पावलं थिरकत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या खास खेळाडूने उघड केले गुपित, सांगितले आयपीएलच्या पहिल्या कमाईतून काय खरेदी केले?
- भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटमधून अटक, काय आहे नेमकं प्रकरण
- “आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा
- सर्वसमावेशक महिला धोरणाचा अवलंब लवकरच-यशोमती ठाकूर
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये लागणार क्रीडा मंत्र्यावर बोली; जाणून घ्या कोण आहे हा मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

