Share

अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा नसून श्रीमंतांचा; अब्दुल सत्तारांचा मोदी सरकारवर निशाणा!

Published On: 

औरंगाबाद: देशातील कर्मचारी वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरीब सध्या महागाईमुळे त्रस्त आहेत. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा नसून श्रीमंतांचा आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन दिले होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करू असे म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर किती गंभीर आहे हे यावरून दिसते. अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी दिली.

मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केली आहे.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देशातील सर्वात मोठा वर्ग पगारदार आहे. त्यांचे लक्ष अर्थसंकल्पातील एकाच गोष्टीवर असते. ते म्हणजे आयकर मध्ये सवलत. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर मध्ये कोणतीही सवलत दिली नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाची निराशा झाली आहे. महागाई वाढल्याने करांमध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र अर्थसंकल्पातून तसे काहीच दिसले नाही. तरुण, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजच्या अर्थसंकल्पात साठ लाख लोकांना रोजगार देण्याचे सांगण्यात आले. म्हणजे पंतप्रधान मोदी सुद्धा दिलेले आश्वासन पाळत नाही. हे यावरून दिसते. देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्हता असलेली कंपनी म्हणजे एलआयसी तिलाच विकण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे देशाची संपत्ती विकून देश चालवण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!