Share

“शरद पवारच दाऊदचा माणूस आहेत की काय?”, निलेश राणेंचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : काल(११ मार्च) पत्रकार परिषदेत बोलत असतांना भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी कुडाळ एसटी डेपो येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून हा रोजगार मिळावा १६ मार्च रोजी होणार आहे अशी माहिती दिली. यावेळी निलेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला. तसेच शरद पवारच (Sharad Pawar) दाऊदचा माणूस आहेत की काय?, असा सवालही निलेश राणेंनी यावेळी केला.

यावेळी बोलत असतांना निलेश राणे म्हणाले की,‘नवाब मलिक हे पवारांचे खास असून अनिल देशमुख हे मराठा होते, त्यांचा राजीनामा घेतला . मग नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे.’ तसेच ज्यांनी दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे?, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे अर्थसंकल्पाविषयी विषयी विचारण्यात आले असता निलेश राणे म्हणाले की,‘मी अर्थसंकल्प पाहिलेला नाही अधिकाऱ्यांनी सांगितलेला अर्थसंकल्प मांडणे हे काही मोठे काम नाही मात्र हा अर्थसंकल्प तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.’ तसेच अजित पवारांना टक्केवारी कळते पण त्यांना फायनान्स कळत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थमंत्री अजित पवार होऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!