Share

Sharad Pawar | “…याचा आनंद आहे”, वेदांता प्रकल्पावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  वेदांता-फॉकस्कॉन प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा प्रकल्प राज्यातून जाण्याला विरोधी पक्षनेते सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत. तर सत्ताधारी नेते महाविकास आघाडी सरकारला दोषी समजतं आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईमधील एका आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पासाठी राज्यात जागाही ठरली होती. नव्या पिढीला अधिक संधी मिळाली असती, त्यामुळे तो प्रकल्प येथे होणं गरजेचं होतं.

तर जास्त आनंद झाला असता –

पुढे बोलताना शरद पवार असंही म्हणाले, वेदांता-फॉकस्कॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही म्हणून काय झाले देशात कुठेतरी होत आहे याचा आनंद आहे.परंतू महाराष्ट्रात झाला असता तर जास्त आनंद झाला असता. त्याचबरोबर हे जरी असले तरी मी विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नसल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

तसेच, राज्य सरकारने गुंतवणुकीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. पण आज जर तसे वातावरण नसेल, तर कोणतीही राजकीय भूमिका न घेता सर्वांनी राज्याच्या हितासाठी गुंतवणुकीचं वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अशा प्रश्नांवर आमची भूमिका सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!