Share

Samsung Sale 2022 | सॅमसंग गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि वेअरेबलवर बंपर सूट

Published On: 

सॅमसंग ने त्याच्या ‘NO MO’ FOMO फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे ज्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, ॲक्सेसरीज, वेअरेबल वर मोठ्या ऑफर आणि कॅशबॅक मिळेल. या ऑफर सॅमसंग डॉट कॉम, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स आणि नवीन सॅमसंग शॉप ॲपवर 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. सॅमसंग शॉप ॲप वापरकर्ते त्यांच्या पहिल्या खरेदीवर 4,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळवू शकतात.

इतका मिळेल डिस्काउंट

‘NO MO’ FOMO सेल दरम्यान, ग्राहक Galaxy स्मार्टफोन्सवर 57 टक्के डिस्काउंट मिळवू शकतात, फ्लॅगशिप Galaxy Z सिरिज आणि Galaxy S सिरिजपासून ते नाविन्यपूर्ण Galaxy A सिरिज आणि Galaxy M आणि F सिरिजपर्यंत.

Galaxy Z सिरिजमधील स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहक 5,199 रुपये किमतीचे वायरलेस चार्जर ड्युओ 499 रुपयांना खरेदी करू शकतात आणि निवडक Galaxy S आणि Galaxy A सिरिज स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना कव्हरवर 50 टक्के डिस्काउंट मिळू शकतो.

सॅमसंग वेअरेबल आणि ॲक्सेसरीजवरही डिस्काउंट

Galaxy टॅब्लेट, वेअरेबल आणि ॲक्सेसरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 55 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. ‘NO MO’ FOMO सेल दरम्यान, नवीन Galaxy लॅपटॉपच्या निवडक मॉडेल्सवर 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाऊ शकतो. Galaxy स्मार्टफोन, टॅब्लेट, वेअरेबल, ॲक्सेसरीज आणि लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांना HDFC बँक आणि ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 15 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

फ्रेम, QLED आणि UHD टीव्ही सारख्या सॅमसंग टीव्हीवर 48 टक्के डिस्काउंट मिळेल. निओ क्यूएलईडी, क्यूएलईडी, द फ्रेम आणि यूएचडी टीव्हीच्या निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर, ग्राहकांना 21,490 रुपयांचा गॅलेक्सी A32 स्मार्टफोन मिळेल, तर निओ क्यूएलईडी टीव्ही (निवडक 8K मॉडेल) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 109,999 रुपये किंमतीचा Galaxy S22 Ultra मिळेल.

‘NO MO’ FOMO सेल दरम्यान, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्हसह सॅमसंग डिजिटल उपकरणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 43 टक्के डिस्काउंट मिळेल. सॅमसंग टीव्ही आणि डिजिटल उपकरणे खरेदी करणार्‍या ग्राहकांना Samsung.com, Samsung Shop app आणि Samsung Exclusive Stores वर ICICI आणि इतर आघाडीच्या बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केल्यास 22.5 टक्के कॅशबॅक मिळेल.

बाय मोर सेव मोर ऑफर

सॅमसंग डॉट कॉम आणि सॅमसंग शॉप ॲपवर बाय मोअर सेव्ह मोअर ऑफर सुरू आहे. या अंतर्गत, 550 सूचीबद्ध उत्पादनांपैकी दोन किंवा अधिक उत्पादनांच्या खरेदीवर ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. Samsung.com वरून खरेदी करणारे ग्राहक 28,000 पिन कोडमध्ये सॅमसंग उत्पादनांच्या सुपरफास्ट डिलिव्हरीचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, ते त्यांची आवडती सॅमसंग उत्पादने खरेदी करण्यासाठी देशभरातील 1,300+ सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सना भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!