Share

Pravin Darekar | मंत्रीमंडळ विस्तारावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आणि महिला आमदाराला स्थान देण्यात आले नाही. तसेच मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रपदी वर्णी लागलेली नाही. तर दुसरीकडे भाजपच्या बड्या नेत्यांना अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. यात आशिष शेलार, प्रवीण दरेकर, नितेश राणे यांसह इतरही नावे आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आज केवळ पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. यात आणखी वाढ होणार आहे. मंत्रिपदाचा कोटा भरलेला नाही. कोणावरही अन्याय होणार नाही. सर्व विभागांना योग्य न्याय मिळेल. पदं कमी असतात आणि इच्छुक जास्त असतात. त्यामुळे ज्यांना पद मिळत नाही ते साहजिकच थोडे नाराज होतात. पण भाजपात अशा प्रकारची नाराजी नसते. सर्व कार्यकर्ते पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो योग्यच असतो असं आम्ही मानतो. मी स्वतः पण जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करतो. देवेंद्रजींनी त्याग आणि समर्पण काय असतं याची शिकवण दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगला पाहिजे.”, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!