Share

Nana Patole । “कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण… “; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकही अपक्ष आमदाराचे नाव नाही. तर या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. तसेच मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या नावांचा समावेश मंत्रिमंडळात आहे. या मुद्यांवरून विरोधकांकडून आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार टीका सुरु आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावरून सडकून टीका केली आहे.

पटोले म्हणाले कि, या सरकारमध्ये कलंकीत सत्तार आणि राठोडांना संधी मिळते पण महिलांना स्थान मिळत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. इतर सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येच भ्रष्ट मंत्र्यांना स्थान दिले जात आहे. यावरून भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. पटोले यांच्या या टीकेवर भा जप काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवरून ग्राफिक्स शेअर केले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ज्यांचे नेते सध्या जेलमध्ये असतील. तसेच ज्यांच्या अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी अगोदर आरसा पाहावा, असे फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!