🕒 1 min read
नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. परंतू या गुजरात सरकारने महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींना सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचे आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देते. हाच महिलांचा सन्मान आहे का?, असं म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारवर टीका केली आहे.
बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वाना माहीत आहे. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. मात्र महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतरही गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसे म्हणून सोडून देतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशाला महिलांविषयी जी दिशा दाखवली तो हाच रस्ता आहे का? यातून सरकार देशाला काय संदेश देत आहे, असा सवालही शरद पवार यांनी मोदी सरकारला केला असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, लोकांचा पाठिंबा मिळत असलेल्या राजकीय पक्षाला सत्तेतून दूर करण्यासाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | महापालिका न्यायालयापेक्षा मोठी आहे का?; राणेंच्या बंगल्याबाबत महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल
- Eknath Khadse | एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला पर्दाफाश! रोहिणी खडसे हल्ला प्रकरणी सादर केला पेनड्राइव्ह
- Sharad Pawar | “केंद्र सरकार ‘ईडी’ सारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करत आहे”; शरद पवार आक्रमक
- Sushma Andhare | “राजकारणासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला जात आहे”, सुषमा अंधारे राज ठाकरे यांच्यावर कडाडल्या
- Shivsena । ’18 महिन्यांत सुमारे 1500 हिंदू कंटाळून परत पाकिस्तानात गेले, अन्…’; शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

