🕒 1 min read
मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काल मुंबईमध्ये मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं असून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. यावेळी केवळ राजकारणासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणाः
कालपर्यंत लावा रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस अचानक बंद कर रे तो व्हिडिओ पर्यंत कसा काय पोहोचतो? भुंगे उतरण्याची भाष्य करणारे भोंग्याच्या बाबतीतच अचानक एकदम शांत कसे काय झाले? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. एवढंच नाही तर राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वेगवेगळे मुद्दे उकडून काढत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
राज ठाकरेंवर हल्लाबोल करत असताना जेव्हा माणसाच्या हातात काहीच राहत नाही सर्व निसटत असताना बाळासाहेब हा एक शब्द आधार देईल म्हणून राज ठाकरे बाळासाहेबांचं नाव घेतात, पक्षीय राजकारणात अथवा युतीच्या राजकारणात विशेषता निवडणूक आणि तिकीट वाटप आथवा सत्ता वाटप याच्या वाटाघाटी असतात त्याचा चव्हाट्यावर बसून केल्या जात नाही, असं देखील अंधारे म्हणाल्या.
बाळासाहेबांचे नाव वगळून राजकारण होत नाहीः
प्रत्येकाच्या हृदयात बाळासाहेब आधिराज्य करत आहेत. बाळासाहेबांचे नाव वगळून राजकारण होत नाही. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वजण बाळासाहेबांचे नाव घेतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध कारणे देत शिवसेना सोडली. ही नैसर्गिक युती होती म्हणून आम्ही तोडली आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो कारण बाळासाहेबांचा तो विचार होता आणि हिंदुत्वासाठी गेलो, असं जर या लोकांचं म्हणणं असेल तर पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला भाजप कोणासोबत गेली होती त्या वेळेला भाजपला नैसर्गिक भीती वाटली नाही का? फितूर आहेत आणि सत्तेसाठी वाटेल त्या पद्धतीने राजकारण करत असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एक-दोन आमदार खासदार इकडे तिकडे गेल्याने शिवसैनिक संपत नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसैनिक आमदारांना घडवतात, आमदार शिवसैनिकांना घडवत नाहीत, असं देखील अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena । ’18 महिन्यांत सुमारे 1500 हिंदू कंटाळून परत पाकिस्तानात गेले, अन्…’; शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमुळे शरद पवार चेकमेट झालेत – अतुल भातखळकर
- Amitabh Bacchan | अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, अमिताभ यांना ‘या’ गंभीर आजाराची लागण
- Atul Bhatkhalkar | …यावरुन शरद पवार यांच्या पक्षाचं चारित्र्य काय हे लक्षात येते- अतुल भातखळकर
- Uddhav Thackeray। “न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, पण त्याचवेळी जनता…”; उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
