मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाजपने देखील आंदोलनाची हाक दिली आहे. सध्या भाजपचे नेते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत आहेत.
दरम्यान आज पुण्यामध्ये आज शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी भूमिका जाहीर केली. प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणासाठी मेळावे घेणार असून त्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू करणार असल्याचं मेटेनी यावेळी सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ? मुख्यमंत्र्यांना कोण जर कोणी आरक्षण देण्यापासून थांबवत असेल तर ते त्यांनी जाहीर करावं असा घणाघात विनायक मेटे यांनी केली आहे.
तसेच प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणासाठी मेळावे घेणार असून त्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू करणार असल्याचं मेटेनी यावेळी सांगितलं. प्रत्येक पक्षाचा नेत्यांनी आपल्या पक्ष नेत्यांशी बोलून भूमिका स्पष्ट करावी तसेच सरकार ने आरक्षणा बाबत नेमके काय धोरण आहे ते स्पष्ट करावे असे मेटे म्हणाले. अन्यथा आपण अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. त्याच बरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी २७ जून ला १० हजार जणांची मोटर सायकल ची रॅली मुंबईत काढणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं.
या सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं याबाबत बोलताना मेटे म्हणाले, ‘सत्तेचा बाहेर कोण मार्गदर्शन करते कोण रिमोट कंट्रोल याला महत्त्व नाही. मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का? त्यांना कोणाचा अडथळा असेल तर ते त्यांनी जाहीर करावं की मला आरक्षण द्यायची इच्छा आहे पण हे आडवे येत आहेत.या सरकार का मराठा समाजाचा बाबतीत काही देणं घेणं नाही. त्यांचा मनामध्ये पाप आहे हे स्पष्ट होत आहे.’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार : अकाली दलाने सोडलेले मंत्रिपद महाराष्ट्रातील महिला खासदाराला मिळणार?
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
