पुणे: लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. ही धक्कादायक घटना लखीमपूर खेरीमध्ये घडली आहे. दरम्यान या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. या घटनेवरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याची क्रूर पद्धत आहे ही. मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. सोबतच त्यांनी #लखीमपुर खीरी नरसंहार असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
हमारे किसानों की आवाज को दबाने का बर्बर तरीका। मैं उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी में हुई घटना की कड़ी निंदा करता हूं।#लखीमपुर_खीरी_नरसंहार
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 3, 2021
दरम्यान याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येत आहे. तर काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांना प्रदेश पोलिसांनी याठिकाणी जाण्यास मज्जाव करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


