Share

‘संघ उद्ध्वस्त करणे खूप सोपे आहे’, भारतीय निवड समितीच्या ‘या’ निर्णयावर माजी क्रिकेटपटू नाराज

Published On: 

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करताना काही धक्कादायक निर्णय घेतले. एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली नाही परंतु निवडकर्त्यांनी स्पष्ट केले की विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा नवा कर्णधार रोहित शर्मा असेल. हा निर्णय समोर आल्यावर क्रिकेटविश्वातही वेगाने चर्चा सुरू झाली आणि ती सातत्याने सुरू आहे. यातच भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल हे निवडकर्त्यांच्या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले.

भारताचा माजी दिग्गज खेळाडू मदन लाल निवडकर्त्यांच्या या निर्णयावर नाराज असून विराट कोहलीला त्याच्या पदावरून का काढून टाकण्यात आले, असा प्रश्न निवडकर्त्यांना विचारला. ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघ खूप यशस्वी होताना दिसत असताना विराट कोहलीला हटवण्यात काय अर्थ होता.

भारताचा 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा अष्टपैलू खेळाडू मदन लाल एका वृत्तसंस्थेची संवाद साधताना म्हणाला, ‘निवडकर्त्यांनी याबद्दल काय विचार केला आहे हे मला माहित नाही, परंतु जेव्हा तो चांगला निकाल देत आहे, तेव्हा त्याला का काढून टाकावे. मी T20 बद्दल समजू शकतो आणि कर्णधार सर्व फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. परंतु जर तुम्ही यशस्वी झालात आणि तरीही तुम्हाला काढून टाकले जाईल, तर ते चुकीचे आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत कोहली कर्णधार होऊ शकला असता असे मला वाटायचे. संघ तयार करणे खूप कठीण आहे, परंतु ते नष्ट करणे सोपे आहे.’

माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, मला काय गोंधळ होता ते समजत नाही. प्रत्येक कर्णधाराचा दृष्टिकोन वेगळा असतो, काय गोंधळ होता. कसोटी आणि मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाची शैली बदलेल. विराट आणि रोहित दोघांचीही कर्णधारपदाची स्वतःची शैली आहे. एमएस धोनीचीही स्वतःची शैली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे ठरते.’

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!