Share

deepesh Bhan | “भाबी जी घर पर है’ मधील लोकप्रिय अभिनेता दिपेश भान याचे निधन; टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Published On: 

मुंबई : ‘भाबी जी घर पर है’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील पात्र मलखान सिंग म्हणजेच अभिनेता दिपेश भान यांचे मुंबईत निधन झाले. शनिवारी सकाळी क्रिकेट खेळत असताना अचानक दीपेश यांच्या नाकातून रक्त येऊ लागले आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

दिपेश हे शुक्रवारी रात्री उशिरा शोचे शूटिंग संपवून घरी आले होते. शनिवारी सकाळी जिममधून आल्यानंतर ते क्रिकेट खेळायला गेले. तेव्हाच हि दुर्दैवी घटना घडली. दिपेश हे फिटनेसबाबतीत अतिशय जागरूक होते. त्यांना कोणतेही व्यसन देखील नव्हते. तरीही त्यांच्याबाबतीत अशी दुःखद घटना घडल्याने त्यांच्या सहकलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान ‘भाबी जी घर पर है’ या टीव्ही मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनित यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या शोमधील अभिनेत्री शुभांगीने हिने एका मुलाखतीत सांगितले कि, “मी देखील दिपेशच्या बिल्डिंगमध्ये राहते. तो सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता आणि तेव्हाच जमिनीवरच बेशुद्ध पडला. आधी आम्हाला सांगण्यात आले होते की त्याचा मृत्यू हार्ट फेल्युअरमुळे झाला आहे. पण आताच माहिती समोर आली आहे कि, दिपेशचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाला आहे.”

दिपेश यांना अभ्यासात रस नव्हता त्यामुळे त्यांनी दिल्लीतून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये ते मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी अनेक कॉमेडी मालिकांमध्ये काम केले. त्यांचे 2019 मध्ये लग्न झाले असून आता १ वर्षांचा मुलगा देखील आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!