Share

‘मोदी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी सैन्याच्या शौर्याचे राजकीय भांडवल केले’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. ते प्रचारानिमित्त नागपूर येथे आले असता त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्वांनी सैन्याच्या शौर्याचे राजकीय भांडवल केले असं ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी पुलवामा हल्ल्यावेळी देशाचे सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत होते. मी स्वतः सरकारने बोलावलेल्या बैठकीत सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेऊन ‘आम्ही देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करणार नाही’, असे सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्वांनी सैन्याच्या शौर्याचे राजकीय भांडवल केले असं ते म्हणाले आहेत.

पुढे बोलतना पवार यांनी ‘पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे ‘घूस के मारुंगा..’, मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः घुसले होते का? असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच पवार यांनी कलम ३७० वरूनही सरकारला फटकारले आहे.

शरद पवार यांनी ‘कलम ३७० रद्द करायला कोणाचाही विरोध नव्हता. फक्त त्यापूर्वी काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांवर देशद्रोही असल्याची टीका करण्यात आली. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहणाऱ्या साहित्यिक आणि नामवंतांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असं विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182507945453477889?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182507352487944192?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!