पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, झाडाझडती होताना अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
आता अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- योगींसाठी प्रतिष्ठेची तर कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ; युपीत भाजपसमोर आव्हाने काय असणार ?
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- राष्ट्रवादीच्या पुण्यातील नव्या कार्यालयाला शरद पवारांनी दिली भेट; ‘त्या’ वादावर केलं उपरोधिक भाष्य
- औरंगाबादच्या ग्रामीण भागात संपर्क वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न, आमदार चव्हाणांचा पुढाकार!
- पैठण येथे भूमिगत गटार योजनेच्या कामाला पुन्हा सुरुवात, दर्गाजवळील ‘तो’ वाद संपुष्टात


