Share

औरंगाबादच्या ग्रामीण भागात संपर्क वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न, आमदार चव्हाणांचा पुढाकार!

Published On: 

औरंगाबाद : आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २४) गंगापूर तालुक्यातील लांझी, पिंपरखेडा, लिंबेजळगाव, पांढरओहळ, शेंदूरवाडा या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत आमदार सतीश चव्हाण यांनी सुचविलेल्या विकासकामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागात आपली मुळे पसरवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

गंगापूर तालुक्यातील लांझी गावअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. पिंपरखेडा येथील मारोती मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. लिंबेजळगाव येथे सिमेंट रस्ता तयार करण्यात येईल. तर शेंदूरवादा येथे सिमेंट रस्ता तयार करण्यात येईल. पांढरओहळ येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. आज या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष बांधणीसाठी संवाद यात्रेस सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही राष्ट्रवादी पोहचवण्याच्या दृष्टीने हे पाऊले उचलल्याचे पाहायला मिळते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.कैलास पाटील, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने, गंगापूरचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नीळ, आदींची उपस्थिती होती. शेंदूरवादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच कोविडच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ.मंगेश घोडके यांना दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!