🕒 1 min read
मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं. तर, चेन्नई सुपर किंग्जला टॉप-४ देखील गाठण्यात अपयश आलं होतं.
दरम्यान, या सत्रामध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या फिरकीपटू हरभजन सिंग व सुरेश रैना यांना वैयक्तिक कारणांमुळे खेळता आलं नाही. या दोन्ही खेळाडूंची कमी यासंघाला मोठ्या प्रमाणात जाणवली. आता, नववर्ष सुरु होताच यंदाच्या १४ व्या सत्राकडे आयपीएल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने हरभजनला संघात न ठेवण्याचा विचार केल्याचं समोर येत आहे. हरभजन गेले २ सत्र चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता.
खुद्द हरभजन सिंगने याला दुजोरा दिला आहे. त्याने एक ट्विटकरून आपला चेन्नई संघासोबतचा प्रवास संपुष्टात आल्याचे सांगितले आहे. हरभजन सिंग म्हणाला, ‘सीएसके सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत दोन वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!’
As my contract comes to an end with @ChennaiIPL, playing for this team was a great experience..beautiful memories made &some great friends which I will remember fondly for years to come..Thank you @ChennaiIPL, management, staff and fans for a wonderful 2years.. All the best..????
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 20, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा शेतकरी आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा !’
- वीज वितरण कंपनीकडून सर्व सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरु आहे – संभाजी ब्रिगेड
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नगरमध्ये पुन्हा राजकीय धुळवड; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- एक ग्रामपंचायत गेली म्हणून काय झालं, चंद्रकांत पाटलांचं काम भक्कम; राणेंनी केली पाठराखण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
