🕒 1 min read
Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रवादी नेते तसेच कार्यकर्ते संतापले आहेत. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचं समजतय.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होतो, तुमच्यासमोरच हे सगळं घडलं, कृपया राजकीय आकसापोटी अशी कारवाई योग्य नव्हे, अशी नाराजगी शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात राजकीय आकस अजिबातच नाही. आव्हाड आणि माझे मधुर संबंध आहेत. कारवाईत सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
दरम्यान, कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केलं त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य आहे. इथे सगळ्या गोष्टी नियमांच्या आदीन राहून केल्या जात आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2023 | आयपीएल मधून पोलार्डने घेतली निवृत्ती, जाता जाता म्हणाला…
- Munde | मुंडे बहिण-भाऊ आले एकाच व्यासपीठावर अन् मग झालं असं काही की, सभागृहात नुसताच हश्शा पिकला
- Vinayak Raut | “राजन साळवी शिंदे गटात सामील होणार?”; विनायक राऊत म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…”
- Ajit Pawar | “वाचाळविरांना आवरा” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना आव्हान
- Arvind Sawant | “रात्रीस खेळ चाले!”, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंंत्र्यांच्या भेटीवर अरविंद सावंतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

