🕒 1 min read
Vinayak Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी (Rajan Salavi) यांची अलीकडेच अचानक सुरक्षा वाढवण्यात आली. त्यामुळे राजन साळवी पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले. त्यांना एस्कॉर्टसह वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सुरक्षा वाढवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले. मात्र साळवी यांनी आपली बाजू मांडत आपण बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत आहोत, मला अडचणीत आणण्यासाठी हे षड्यंत्र केल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. गजानन कीर्तिकर यांच्यानंतर आता ठाकरे गटातील कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी हेदेखील लवकरच शिंदे गटात सामील होणार, असा दावा केला जात आहे. याच चर्चेवर उद्धव ठाकरे गटातील नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केलंय.
“राजन साळवी खाल्ल्या मिठाला जागून शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी काम करतील”, असा विश्वास विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय.
ते म्हणाले, “राजन साळवी हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही कसे काम करायचे हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे. काही लोक राजन साळवी यांच्या बाबतीत कंड्या पिकवण्याचे काम करत आहेत. त्यांचा तो धंदाच आहे. मात्र राजन साळवी हे निष्ठावंत म्हणजे काय असतं, हे दाखवून देणार आहेत, याची आम्हाला खात्री आहे.”
दरम्यान, राजन साळवी यांनी आपण बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. आमच्या रक्तात शिवसेना आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपण ठाकरेसेनेतच राहणार, असं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | “रात्रीस खेळ चाले!”, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंंत्र्यांच्या भेटीवर अरविंद सावंतांची टीका
- Rohit Pawar | “कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा
- सारा अली खान ला डेट करतोस का? शुभमन गिल म्हणाला…
- Amruta Fadanvis | आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व – अमृता फडणवीस
- Sanjay Raut Birthday | “रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे…”, संजय राऊतांना रोहित पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
