🕒 1 min read
सातारा : रयत शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातील जाळं हे फार मोठं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये रयतचं नाव घेतलं जातं. आता ही शिक्षण संस्था वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काल रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
यानंतर उमटणारे प्रतिसाद व इतर काही प्रतिकूल परिणाम होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाऊले उचलल्याचं बोललं जात आहे. शरद पवार या घटनेनंतर तेहत साताऱ्यात दाखल झाले. यामागे माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांनी दिलेला तडकाफडकी राजीनाम्याचं कारण होतं. इतकंच नाही तर रयतला यानंतर आणखी एक धक्का बसला. तो म्हणजे माजी सचिव अरविंद बुरुगले यांनीही साताऱ्यात रयत काऊन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा दिला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही संस्था महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात स्वतः जाऊन पोहोचवली. आज समाजात दिसणारे अनेक उच्च अधिकारी, यशस्वी उद्योजक, प्रमुख राजकारणी व्यक्तींनी याच शिक्षण संस्थेतून शिक्षण घेत आपल्या आयुष्याचा पाया घडवला. मात्र, आता या दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय असल्यानेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात दाखल झाले होते. या शिक्षण संस्थेत सध्या प्राध्यापक भरती घोटाळ्याचा संशय येताच पवारांनी स्वतः लक्ष घालून गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचे सल्लागार राज्य बुडवणार -देवेंद्र फडणवीस
- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आघाडीवर
- कोरोना काळात मदत करणारे रिअल लाइफ हिरो
- ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि तब्बल ‘इतका’ निधी मिळवा; आ. सुनील शेळकेंचा ही पुढाकार
- भारत भालकेंच्या आठवणीत शरद पवार भावुक, म्हणाले…


