Share

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आघाडीवर

Published On: 

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीला आता वेग आला आहे लवकरच नव्या अध्यक्षांची निवड जाहिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छूकांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीसाठी गुरुवारी दुपारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात सुमारे दीड तास महत्त्वाची बैठक झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांची नावं आघाडीवर आहेत. या बैठकीत त्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुंबईत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पुन्हा मराठी चेहरा मिळणार, की अमराठी नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार, याची उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!