Share

ठाकरे सरकारचे सल्लागार राज्य बुडवणार -देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती देत चांगलाच दणका दिला आहे. यातून ठाकरे सरकार काहीतरी बोध घेईल अशी आशा असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे.

दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी घेण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली का, माहिती नाही, परंतु हा पोरखेळ चालवला आहे अशी टीका त्यांनी केली.

यामुळे राज्य सरकारला अतिरिक्त भुर्दंड तर पडेलच, पण वार्षिक देखभाल-दुरुस्ती खर्च पाच-सहापट अधिक होईल. हे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला. राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही. महाराष्ट्राचे नुकसान केले जात असून अशाप्रकारे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!