Share

कोरोना काळात मदत करणारे रिअल लाइफ हिरो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. या कठिण परिस्थितीमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं मदतीची गरज होती तेव्हा रुपेरी पडद्यावर झळकणारे अनेक अभिनेते खऱ्या जीवनातही ‘हिरो’ ठरले.

sonu

लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.

हृतिक रोशन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठी मदत देण्यासोबतच हृतिकनं पोलीस अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसह इतरही कोविड 19 फ्रंट लायनर्सना शक्य त्या सर्व परिंनी मदत केली. रेल्वे प्रवासादरम्यानच्या जनजागृतीसाठी त्यानं सोशल मीडियाच्या आधारे मोलाचं योगदान दिलं.

सलमान खान फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (एफडब्ल्यूआईसीई)मधील जवळपास 25 हजार दैनंदिन भत्त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली. अनेक स्पॉटबॉयचीही त्यानं मदत केली. ‘बिइंग ह्यूमन’ या संस्थेमार्फत त्यानं गरजूंपर्यंत भोजनाची
सामग्री पोहोचवली. शिवाय अनेकांना त्यानं अन्नदानासाठी प्रोत्साहितही केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!