मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि संप आता एसटी महामंडळ संपवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०० ते ३५० कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कामगारांनी २४ तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल, अशी नोटिस बजावण्यात आली आहे.
एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महामंडळाने आतापर्यंत एकूण २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे मोडून काढण्याच्या तयारीत महामंडळ असल्याचे दिसत आहे.
एसटी कामगारांच्या २८ युनियन आहेत. त्या युनियनचे प्रतिनिधी सरकारला भेटून चर्चा करतात. त्यांच्या अनेक मागण्या मार्गी देखील लावल्या आहेत. मात्र ते पुन्हा चर्चेसाठी येत नाहीत, अशा परिस्थितीत काय करायचे, असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. सध्या कामगारांचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली. सरकारचा दोन्ही वेळचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. कामगारांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो असे सांगून ते गेले, पण पुढं काहीच झालेलं नाही, अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न परब यांनी मिडियाशी बोलताना उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
- केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक, म्हणाले…
- ‘..तर फडतूस रझा अकादमीची ‘बंद’ची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती’
- आज पहिल्या टी 20 सामन्यात ‘या’ पाच खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
- राष्ट्रवादीचे मिशन विदर्भ; भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांचा दौरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
