🕒 1 min read
मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना, ठणकावून सांगतो गद्दारी तुम्ही केली, दिल्लीला गेले असते तर सत्ता टिकली असती, अशा भाषेत टीका केली होती. उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमांमध्ये तानाजी यांनी हे भाष्य केलं होतं. यावर युवा सेनेचे राज्य विस्ताराक शरद कोळी यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर दिलं आहे.
शरद कोळी यांनी उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू, असा इशारा शिंदे गटाला आणि तानाजी सावंत यांना दिला आहे. शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तोंड सांभाळून बोलावं, सत्ता कायमची नसते, ती येत-जात राहते, पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये, असा देखील गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावण्यात आलं होतं. पण शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत, उद्धव ठाकरे देखील झुकणार नाहीत, असं उदाहरण देत शरद कोळींनी तानाजी सावंत यांना उत्तर दिलं आहे.
दरम्यान, शरद कोळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक असले तरी त्यांच्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार असल्याची माहिती शरद कोळी यांनी म्हटलं होतं. तसेच सोलापुरातील दहा हजार युवा सैनिक व शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार असून याबाबत युवा सेना व शिवसेनेने जय्यत तयारी केली असल्याची माहिती कोळी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “… तर अडीच लाख तरुण उद्योजक झाले असते”, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
- Bhaskar Jadhav । रामदास कदम फॉस्कॉनला ‘पॉपकार्न’ बोलतात, ते कोकणातील जोकर; भास्कर जाधवांचा हल्लाबोल
- MNS । ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला ‘हर हर महादेव’ने प्रत्युत्तर; पुण्यात मनसे आक्रमक!
- Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव
- Ambadas Danve । “… पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी हे करावेच लागेल”; दानवेंचा शिंदेंना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
