🕒 1 min read
मुंबई : वेदांता फॉक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला आता सत्ताधारकांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी वर निशाणाः
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जिवंत करून आम्ही मराठा समाजाला न्याय दिला, हेच मंडळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात असतं तर जवळपास अडीच लाख मराठा तरुण उद्योजक झाले असते, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचं माथाडी कामगारांना त्यांच्या समस्या सोडण्याचा आश्वासन:
नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने माथाडी कामगारांना त्यांच्या समस्या सोडण्याचा आश्वासन दिलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे धूळ खात पडून होतं. पण आम्ही महामंडळाला संजीवनी देऊन मराठा समाजाला न्याय दिला असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले.
माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी जिल्हा तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या, समाजात जनजागृती केली आणि 50000 मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली, असे देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी देखील पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला. वेदांचा फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेला असला तरी महाविकास आघाडी सरकारने चार प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाहीत, त्याचे उत्तर द्या, असं निर्मल सीतारामन यांनी यावेळी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- MNS । ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला ‘हर हर महादेव’ने प्रत्युत्तर; पुण्यात मनसे आक्रमक!
- Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव
- Ambadas Danve । “… पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी हे करावेच लागेल”; दानवेंचा शिंदेंना सल्ला
- Ajit Pawar | “एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीसांकडे सहा जिल्हे म्हटल्यावर…” अजित पवार
- Ajit Pawar | “मी पण आईला भेटतो पण फोटो काढत नाही”, अजित पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
