पुणे : शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे पीएफआय यांच्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणेने खळबळ उडवली आहे. राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) यांनी पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटने वरील छापेमारी विरोधात काल आंदोलन केलं होतं. यावेळी पाकिस्तानी जिंदाबाद आणि अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर या प्रकरणावर मनसे पक्ष पुण्यात आक्रमक झाला आहे.
या घटनेनेनंतर मनसेने पुण्यात जोरदार आंदोलन केले. ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले. ‘दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ अशा आक्रमक घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज मनसेकडून जाळण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी अलका टॉकीज चौकात बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, याठिकाणीची परिस्थिती हातळण्याचं काम, पोलिसांकडून करण्यात येत आहे.
नेमकं काय झालं होत ?
कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या व्हिडिओ बाबत आणि त्यात देण्यात आलेल्या घोषणांबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव
- Ambadas Danve । “… पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी हे करावेच लागेल”; दानवेंचा शिंदेंना सल्ला
- Ajit Pawar | “एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीसांकडे सहा जिल्हे म्हटल्यावर…” अजित पवार
- Ajit Pawar | “मी पण आईला भेटतो पण फोटो काढत नाही”, अजित पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
- MNS । ‘त्या’ रिकाम्या खुर्चीवर ते राऊतांच्या चपलाही ठेवतील; मनसे नेत्याकडून शिवसेनेचा समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

