Share

‘ते’ माझाही जीव घेणार, पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुजाच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आहे. हे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले.

पुजाच्या कुटुंबीयांनी सरकार आणि तपास यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ”आम्ही आमची मुलगी गमावली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना शिक्षा द्यावी. या प्रकरणातील संशयावरून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु, केवळ संशयावरून राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. यावरून आता पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.

‘ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील’, असा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला आहे.

त्यानंतर आता शांताबाई राठोड यांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे’, असा दावा शांताबाई राठोड यांनी केला आहे.

‘मी याबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली नाही. परळीला गेल्यानंतर तक्रार देणार आहे. माझ्या जीवाला काही धोका झाला किंवा मला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले नाही, अशा आरोपींची नावं मी तृप्ती देसाई यांच्याकडे दिली आहे’, असंही शांताबाई राठोड म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!