🕒 1 min read
मुंबई: ‘फिरकी’चा जादूगार शेन वॉर्नच्या निधनामुळे त्याचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये सुट्टीवर असताना वॉर्नचा अकस्मित मृत्यू झाला. त्याचे व्यवस्थापक जेम्स एरस्काइन यांनी देखील सांगितले की, सुट्टीवर जाण्यापूर्वी तो २ आठवडे फक्त लिक्विड डायट घेत होता. वॉर्नने छातीत दुखणे आणि घाम येत असल्याची तक्रारही केली होती. आता पोस्टमार्टम रिपोर्टही बाहेर आला आहे.
शेन वॉर्नच्या (shane warne) रूममध्ये रक्ताचे डाग सापडल्याचे वृत्त आले होते. मात्र आता त्याच्या मृत्यूमागे कोणताही कट असण्याची शक्यता थायलँड पोलिसांनी फेटाळून लावली आहे. पोलिसांनी सांगितले की, पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पथानाचारोन यांनी एका निवेदनात सांगितले की, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे.
वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना शंका नाही, असे त्यात म्हटले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त जनरल सुरचेत हकपर्न म्हणाले, “संघर्षाची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत आणि कोणत्याही साहित्याचे नुकसान झाल्याची कोणतीही बातमी नाही. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले आहे की त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. वॉर्नच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या छातीत दुखत होते आणि सुट्टीवरून परतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार होती. त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे, ही हत्या नाही.” वॉर्नचे राजकीय सन्मानसह अंतिम संस्कार होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : धोनीचा नवा लूक व्हायरल; सुरतमध्ये सीएसके संघाचे जोरदार स्वागत
- कापसाचे दर 8 ते 10 हजारांवर स्थिरावले! नेमकं कारण काय? पहा..
- “अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही”, पडळकरांचा खोचक टोला
- IPL 2022: एबीची आयपीएलमध्ये पुन्हा एंट्री होणार! तेही एका नव्या रूपात
- “बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, पण…”, ज्वाला धोटेंचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
