Share

IPL 2022: एबीची आयपीएलमध्ये पुन्हा एंट्री होणार! तेही एका नव्या रूपात

Published On: 

मुंबई: क्रिकेट जगतात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी त्याची भूमिका वेगळी असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये त्याला नवी जबाबदारी मिळू शकते, असे बोलले जात आहे. डिव्हिलियर्सने अनेक वर्षे आयपीएलमध्ये आरसीबीचे खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केले आहे .

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) आयपीएलच्या शेवटच्या हंगामानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यामुळे तो आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. असे असूनही, डिव्हिलियर्स IPLच्या 15 व्या हंगामात पुन्हा दिसणार आहे. तो लवकरच आरसीबीचा (RCB) मेंटॉर म्हणून आयपीएलमध्ये दिसू शकतो. याबाबत अजूनही कोणती माहिती आरसीबीने दिली नसली तरी चाहते उत्साहित दिसत आहेत.

एबी डिव्हिलियर्सने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१० पर्यंत तो दिल्ली कॅपिटल्सचा (डेअरडेव्हिल्स) भाग होता. यानंतर, २०११ मध्ये, तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. २०२१ पर्यंत तो आरसीबीकडून खेळत राहिला. डिव्हिलियर्सची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांच्या १७० सामन्यांमध्ये ५१६२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन शतकांसह ४० अर्धशतके झळकावली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद १३३ होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो सहावा फलंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!