Share

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही”, पडळकरांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या शेतकऱ्यांच्या वीज कापणीवरून भाजपने मविआ सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार(Ajit Pawar)  तुमच्या शब्दाला राज्यात काडीची किंमत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

“विजेच्या प्रश्नावर अजित पवार सभागृहात बोलले होते. राज्यातील एकाही शेतकऱ्याच्या विजेचं कनेक्शन कट केलं जाणार नाही. पण त्यांच्या बोलण्यानंतर तिसऱ्याच दिवशी ऊर्जामंत्र्यांनी ,सांगितलं की बील भरा अन्यथा कनेक्शन कट होणार. त्यामुळे अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, त्यांनी मोठेपणा दाखवायचा बंद करावा”, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधत त्यांच्या शब्दाला किंमत उरली नसल्याचे म्हटले होते. तर आता गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे. राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सध्या वीज बिल कापणीवरून भाजप ठाकरे सरकारला चांगलेच घेरत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!