Share

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी रविवारी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकांसह अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

अभिनेत्री निया शर्माने तरला जोशी यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. निया शर्माने तरला जोशी यांच्यासोबत ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेत काम केले होते. निया शर्माने तरला जोशींचे फोटो शेअर करत लिहिले की, ‘बडी बीजी तुमची आठवण येईल. तरला जी तुम्ही नेहमी बडी बीजी राहता’. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.

तर ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते. तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून प्रचलित होत्या. तसेच त्यांनी बंदिनी, मालिकांमध्ये काम केले आहे. बंदिनी या मालिकेतून तरला यांना ओळख मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!