Share

Monsoon Session | ’50 खोके एकदम ओके’.. तुम्हाला पाहिजे का?; शिंदे गटाची विरोधकांना ऑफर

Published On: 

Monsoon Session | मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी पक्षाचे नेते विधानसभेच्या परीसरात येताच विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. “आले रे आले गद्दार आले”, “50 खोके एकदम ओके!”, “रोख घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!” या नई अशा अनेक घोषणा विरोधी पक्षातील नेत्यांनी दिल्या. विशेष म्हणजे घोषणा देताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे चांगलेच जोशात दिसले. तर विरोधकांच्या याच घोषणांना सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यावर ‘५० खोके तुम्हाला पाहिजे का?”, अशी ऑफर शंभूराज देसाई यांनी दिली. विरोधकांच्या घोषणांना ‘पाहिजे का, पाहिजे का’, असं प्रत्युत्तर देताना देसाई मिश्कीलपणे हसत होते. त्यावर विरोधकही हसताना दिसले.

महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावेळी अधिवेशनात आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून नव्या सरकारची कसोटी लागणार आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या.

गायकवाडांची मुंडेंवर आक्रमक शब्दात टीका

“राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही?”, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला. तर गायकवाड यांनी धनंजय मुंडे यांचाही चांगलाच समाचार घेतला. गायकवाड म्हणाले की, “धनंजय मुंडेंची सगळी लफडी महाराष्ट्रातील टीव्हीवर बाहेर आली, जे एक लोकप्रतिनिधी म्हणजेच मंत्री आहेत आणि त्यांचीच लफडी समोर आली. ते राज्यभर लफ़डी करत फिरतात त्यांनी आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे?… आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत. शिवसेना हि आमची आहे. आम्ही काही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही.”, अशी जहरी टीका शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!