Share

Manisha Kayande | एकनाथ शिंदे यांची स्वप्ने मुंगेरीलालची स्वप्ने बनतील – मनीषा कायंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनिषा कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांची स्वप्ने मुंगेरीलाल यांची सुंदर स्वप्ने ठरतील. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सुमारे 40 आमदार फोडून भाजपच्या पाठिंब्यावर आपले सरकार स्थापन केले आहे.

विरोधी पक्षांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल-

विरोधी पक्षांनी “50 खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देत एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला. खरे तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा भाजपवर आरोप करण्यात आले की, त्यांनी 50 कोटी देऊन सेनेचे आमदार फोडले आहेत.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. ‘आले रे आले गद्दार आले’ अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी शिदे गटाच्या आमदारांना लक्ष्य केले.

असंवैधानिक सरकार – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले की, “आम्ही लोकशाहीच्या मारेकऱ्यांच्या विरोधात उभे आहोत, हे देशद्रोही सरकार आहे, हे सरकार पडणार आहे, हे असंवैधानिक सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमान लोकांचे सरकार आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!