Share

Anil Bonde | “पापं केलेल्यांची धुग धुग वाढली असेल”; कंबोज यांच्या ट्विटवर बोंडे यांची प्रतिक्रिया

Published On: 

अमरावती : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा आणखीन एक बडा नेता जेल मध्ये जाणार असल्याचं भाकीत केलं आहे. यावरून सध्या विरोधी पक्षाच्या गोटात टीकांचं सत्र सुरु आहे तर दुसरीकडे खासदार अनिल बोंडे यांनी कंबोज यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे.

अनिल बोंडे म्हणाले कि, “जोपर्यंत कुणी काहीही काही केलेले नाही, असं सिद्ध होत नाही किंवा दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही घोटाळ्याची फाईल बंद करू नये. कारण हीच जनतेचीही भावना आहे. जनतेला वाटतं की कोणता नेता जनतेचा पैस खात असेल तर त्याला तो पैसा पचू नये आणि जनतेच्या याच भावनांचा देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आदर करेल.” तसेच पुढे त्यांनी एक सूचक वक्तव्यही केलं आहे. “कंबोज यांनी केलेल्या ट्विटनुसार आता ‘अ’ वरचा नेता जाणार आहे की ‘ब’ वरचा नेता जाणार माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे, ज्यांनी ज्यांनी पाप केले आहे त्यांच्या मनामध्ये आता धुग धुग् वाढली असेल येवढं निश्चित.”

अमोल मिटकरींची कंबोज यांच्यावर टीका

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले कि, मोहित कंबोज हे कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत हे सर्वांना माहिती आहे. ते मुंबईत विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, मोहित कंबोज यांनीच भोंगे वाटले होते. ते भाजपाचे भोंगे आहेत. शेतकरी, जीसएटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत. हा कोण आहे मोहित कंबोज असा एकेरी उल्लेखही यावेळी त्यांनी केला. तसेच त्यांनी ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे, असंही मिटकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!