Share

Shalini Thackeray : “शिवसेनेची ‘निष्ठा यात्रा’ एक बहाना…”, शालिनी ठाकरेंची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray ) यांनी टीका केली आहे.

“आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही….. समय समय की बात है…..!”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी संपलेला पक्ष हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला कालपासून म्हणजेच 8 जुलैपासून सुरुवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करत आहेत. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!