Share

बीडच्या राजकारणाला हादरा, पंकजा मुंडेंनी घेतला मोठा निर्णय

Published On: 

बीड : अवघ्या काही तासावर मतदान आलेले असताना भारतीय जनता पक्षाने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालत निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सत्ताधाऱ्यांनी लोकशाही प्रक्रिया पायदळी तुडवल्याचा आरोप करत बहिष्कार टाकत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी उद्या, दि. २० मार्च रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गुरुवारी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी आणि उमेदवार यांची बैठक घेऊन निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना केली होती.

त्या अगोदर संस्था मतदार संघातील अकरा जागेवर एकही अर्ज वैध न ठरल्याने केवळ आठ जागांसाठी निवडणूक होणार होती. त्या दृष्टीने पंकजा मुंडे या आज शुक्रवारी बीड जिल्ह्यात आल्या. त्या निवडणूक बाबत काहीतरी फिल्डिंग लावतील असे वाटले होते. मात्र, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा यांनी भाजप या निवडणुकीत बहिष्कार टाकत असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. भाजपने बहिष्कार टाकल्याने आता ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी का माघार घेतली हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!