नवी दिल्ली : पाकिस्तानचा दिग्गज माजी अष्टपैलू आणि माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने रावळपिंडी पिचबद्दल मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला की पिच या पद्ध्तीने तयार केली होती की, ज्यामुळे पाकिस्तान संघ या सामन्यात विजय मिळवू शकेल. यामुळेच इतकी खराब पिच तयार केली गेली.
पाकिस्तानी न्युज चॅनेल समा टीव्हीवर बोलताना तो म्हणाला की, “त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केला नाही. त्यांचा विचार एकाच होता की आम्ही हरलो नाही पाहिजे. परंतु आता लाहोर आणि कराची येथे होणाऱ्या सामन्यांसाठी तरी पिच चांगली तयार करावी. कारण नंतर ज्यावेळी तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जाल त्यावेळी तुम्हाला खूप स्ट्रगल करावे लागेल.” अशी कडवट प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तानम्स्ध्ये खेळण्यासाठी गेला आहे. रावळपिंडी येथे या दोन्ही संघात पहिला सामना झाला. मात्र या सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ४ बाद ४७६ धावांवर पहिला डाव घोषित केला. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ४५९ धावांवर संपला. दुसऱ्या डावात पाकिस्तानने बिनबाद २५२ धावसंख्या केली. परंतु सामन्याचे दिवस संपल्यामुळे सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात दोन्ही डावात शतक करणाऱ्या इमाम उल हकला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

